शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अवैधरित्या चीनला ५ लाख मास्क अन् ५७ लीटर सॅनिटायझर पाठवण्याचा डाव हाणून पाडला!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 12:49 IST

दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं.

ठळक मुद्देया सर्व वस्तू देशाबाहेर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होताहा माल परदेशात कोण पाठवत होता याचा शोध घेतला जात आहेबर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर भारताकडून बंदी घातली आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचं संक्रमण देशभरात वाढत असताना ७८ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर अडीच हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देशात मास्क, सॅनिटायझर आणि पीपीई किट्स या सुरक्षा उपकरणांची मागणी वाढत आहे. अशातच अवैधरित्या या वस्तू चीन आणि अन्य देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं. विभागाने ५ लाख ८० हजार मास्क, ९५० बॉट्ल्समध्ये ५७ लीटर सॅनिटायझर आणि नवी दिल्लीयेथील कूरिअर टर्मिनलवर ९५२ पीपीई किट्ससह अन्य शिपमेंट थांबवण्यात आलं. या सर्व वस्तू देशाबाहेर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता. यासोबतच कस्टम विभागाने २ हजार ४८० किलो रॉ मटेरियलदेखील जप्त केले. जे चीनला पाठवण्यात येत होते.

आता या प्रकरणाचा तपास केला जात असून हा माल परदेशात कोण पाठवत होता याचा शोध घेतला जात आहे. डीजीएफटीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हे सामान निर्यात केलं जाऊ शकत नाहीत. सध्या देशात कोरोना विषाणूच्या साथीचे संकट आहे अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजी सरकारने या वस्तूंची निर्यात थांबविली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील आहेत. त्याचवेळी या संकटात भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे काम सुरू आहे.

कोरोना व्हायरसच्या या लढाईत या वैद्यकीय वस्तू महत्वाची भूमिका बजावतात. कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच या वैद्यकीय उपकरणांची मागणीही सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत हा माल गुप्तपणे परदेशात पाठविणे गुन्हा मानला जातो.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!

...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन