शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

CoronaVirus News: दिल्लीत दररोज १८ हजार चाचण्या घेण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 2:40 AM

सर्वपक्षीय बैठक; राजकारण बाजूला ठेवण्यावर एकमत

नवी दिल्ली : राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याची गरज आहे, असे दिल्लीतील आप पक्षाचे सरकार व तिथे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने म्हटले आहे. येत्या शनिवारपासून दिल्लीत दररोज कोरोनाच्या १८ हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाने तेथील सत्ताधारी आप व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली. त्यामध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता व आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आदी सहभागी झाले होते. संजय सिंह यांनी सांगितले की, दिल्लीत दररोज कोरोनाच्या १८ हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. कोरोनाशी मुकाबला करताना दिल्लीतील विविध रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नेते आदेश गुप्ता म्हणाले की, खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी वाट्टेल ते शुल्क आकारत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना चाप लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत एक अभ्यास गट आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत. त्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.मेडिकल विद्यार्थ्यांनाही रुग्णसेवेत सामावून घ्यादिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिलकुमार यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ती रोखण्यासाठी केंद्रातील भाजपचे व दिल्लीतील आप सरकार प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. दिल्लीमध्ये कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही कोरोना रुग्णांच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही अनिलकुमार यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या