शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 08:53 IST

बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला.

ठळक मुद्देजगभरातील सरकारे कोरोनामुळे लोकांना बाहेर न पडण्याची आणि वेगवेगळे राहण्याचे आवाहन करत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती येत्या काही दिवसांत 20 डॉलरवर येण्यातची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

न्युयॉर्क : कोरोना व्हायरसमुळे जगभरात शटडाऊनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे वाहतूक मंदावल्याने तेलाची मागणीही कमी झाली आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून 16 वर्षांपूर्वीची निचांक गाठला आहे. 

बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला. तर ब्रेंट क्रूडच्या किंमती 16 वर्षांपूर्वीची निचांकीवर आल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत 26 डॉलर तर अमेरिकी तेलाची किंमत 23 डॉलरवर आली आहे. 

गोल्डमॅन सॅक्सिने सांगितले की, जगभरातील सरकारे कोरोनामुळे लोकांना बाहेर न पडण्याची आणि वेगवेगळे राहण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे वाहनांचा वापर कमी झाला आहे. याचा परिणाम मागणीवर झाला असून मार्चच्या शेवटी तेलाची जागतिक मागणी घटून प्रतिदिन 80-90 लाख बॅरल एवढीच राहू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. तेलाच्या विक्रीमध्ये वार्षिक 11 लाख बॅरल प्रतिदिनची घसरण होऊ शकते. हे एकप्रकारचे रेकॉर्डच असणार आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमती येत्या काही दिवसांत 20 डॉलरवर येण्यातची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये ही घट होऊ शकते. बुधवारी ब्रेंट क्रूड 26.65 डॉलरच्या स्तरावर येऊन 26.05 वर व्यवहार करत होते. हा स्तर 2003 नंतरचा सर्वात खालचा आहे. तर अमेरिकी क्रूड सकाळी 4 डॉलरची घसरण नोंदवत 22.95 डॉलर प्रति बॅरल झाले होते. हा मार्च 2002 नंतरचा सर्वात खालचा स्तर आहे.

देशातील इंधनाचे दर जाणून घ्यादरम्यान, आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेलाच्या किमतींमध्ये डॉलरमध्ये घट होत असतानाही भारतातील इंधनाच्या किंमतीत काही पैशांनी घट करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 75.30 आणि डिझेलचा दर 65.21 रुपये आहे. शेवटचा बदल सोमवारी झाला होता. 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल