शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोविड-१९ हे तर जैविक युद्ध! जागतिक स्वास्थ्य संघटनेचे सांसर्गिक रोग विशेषज्ञ डॉ. पीटर बेन एम्बारेक यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 07:45 IST

कोविड-१९ हा विषाणू वुहान व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये तयार झाला व त्याचा जगभर प्रसार करण्यासाठी मध्यवर्ती वुहानमधील एका ठोक मासळी बाजाराचा उपयोग करण्यात आला

- सोपान पांढरीपांडे नागपूर : जागतिक स्वास्थ्य संघटनेचे सांसर्गिक रोग विशेषज्ञ डॉ. पीटर बेन एम्बारेक यांनी कोविड-१९ हा विषाणू चीनमधील वुहानमध्येच तयार झाल्याचा आरोप नव्याने केल्याने कोविड-१९ ची साथ हे जैविक युद्ध असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.अमेरिकेन वृत्तपत्रांनी शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-१९ हा  विषाणू वुहान व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये तयार झाला व त्याचा जगभर प्रसार करण्यासाठी मध्यवर्ती वुहानमधील एका ठोक मासळी बाजाराचा उपयोग करण्यात आला, असाही आरोप डॉ. एम्बारेक यांनी केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेई यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या जगभर १८० देशांत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन घोषित झाला आहे व जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. एप्रिलमध्ये एकट्या अमेरिकेत २ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या आहेत तर भारतातील बेरोजगारी २७ टक्क्यांवर (१४ कोटी बेरोजगार) गेल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनामीने (सीएमआयई) काढला आहे. त्यामुळे स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी चीनने जैविक युद्ध सुरू केले आहे, अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. तिला डॉ. एम्बारेक यांच्या आरोपाने बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जगात आलेल्या साथीच्या रोगांचा उदाहरणार्थ सीव्हीआर अ­ॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा (सार्स) मृत्यूदर १० टक्के हाता. त्यानंतर आलेल्या मिडल-ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा (मेर्स) मृत्यूदर तब्बल ३४ टक्के हाता. परंतु त्यावेळी कुठलेही लॉकडाऊन झाले नव्हते. आता कोविड-१९ चा मृत्यूदर केवळ २ टक्के असताना संपूर्ण जगच बंद केले गेले आहे. यावरूनही कोविड-१९ हीसाथ जैविक युद्ध असण्याला दुजारा मिळतो.बायोलॉजिकल वेपन कन्वेन्शन : मार्च १९७५ मध्ये जगातील १८३ देशांनी बायोलॉजिकल वेपन कन्वेन्शनवर सह्या केल्या. यात कुठल्याही देशाने जैविक विषाणू तयार करू नये व त्याचा वापर हत्यार म्हणून मानवजातीविरुद्ध करू नये, असे ठरले होते. चीन, अमेरिकाभारत हे देशही या कराराचे सदस्य आहेत. १९७८ मध्ये चीनने आर्थिक उदारवादाचा पुरस्कार केल्याने चीनची औद्योगिक प्रगती सुरू झाली व नंतरच्या ३५-४० वर्षांत चीन ही जगातील दुसरी आर्थिक सत्ता (अमेरिकेनंतर) बनली आहे. दोन्ही देशात गेल्यावर्षी व्यापार युद्ध सुरू झाले व एकमेकांच्या मालांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याचा प्रकार सुरू झाला. याचाच पुढील भाग जैविक युद्धाचा आहे व तो चीन कोविड-१९ मार्फत लढत असल्याची शक्यता आहे.अधिकृत आरोप नाही : विशेष म्हणजे, अमेरिकेने चीनविरुद्ध अजूनही जैविक युद्ध छेडण्याचा आरोप केलेला नाही. परंतु दोन्ही देश भारताचा यात उपयोग करून घेत आहेत. भारताने मात्र जागतिक स्वास्थ्य संघटनेने हा करार सक्तीने लागू करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतchinaचीनUnited Statesअमेरिका