CoronaVirus : जगातील १५ कोरोना फ्री देश, आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 04:31 PM2020-04-15T16:31:55+5:302020-04-15T16:36:46+5:30

CoronaVirus : मात करण्यासाठी अनेक देशांकडून उपाययोजना सुरु आहेत.

CoronaVirus: Countries Which Are Still Coronavirus In World Free List rkp | CoronaVirus : जगातील १५ कोरोना फ्री देश, आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही

CoronaVirus : जगातील १५ कोरोना फ्री देश, आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही

Next

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. चीनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास तीन महिन्यात संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार झाला. आतापर्यंत जगभरात २० लाखहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सव्वा लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांकडून उपाययोजना सुरु आहेत. मात्र, जगातील असे काही देश आहेत, त्याठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. जगातील आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या सात खंडापैकी सहा खंडामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. फक्त अंटार्क्टिका हा एक खंड आहे, ज्याठिकाणी कोरोना प्रादुर्भाव झाला आहे. 

जगातील २१० देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, असे १५ देश आहेत, त्या देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यामध्ये कोमोरोस, किरिबाती, लेसोथो, मार्शल आइलँड्स, मायक्रोनेशिया, नॉरू, नॉर्थ कोरिया, पलाऊ, समोआ, सोलोमन आयलँड्स, ताझिकिस्तान, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालु आणि वानुअतु या देशांचा समावेश आहे.

काय आहे कारण?
सर्वांत पहिले कारण म्हणजे, येथील लोकसंख्या कमी आहे. या १५ देशांमध्ये जास्तकरून लहान लहान बेटे आहेत. ती जास्त प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही नियमाशिवाय सोशल डिस्टेंसिंग होत असते. 

नॉर्थ कोरियामध्ये एकही रुग्ण नाही
मिसाईल चाचणीवरून चर्चेत झालेला नॉर्थ कोरिया कोरोनाच्या संकटापासून लांब आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वेळेवर सर्व रस्ते, समुद्र आणि हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती, असे नॉर्थ कोरियाने म्हटले आहे. विशेष म्हणजे नॉर्थ कोरिया सरकारने कोरानाचा एकही रुग्ण नसताना क्वारंटाईन बेडची व्यवस्था केली होती.
 

Web Title: CoronaVirus: Countries Which Are Still Coronavirus In World Free List rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.