शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus: "देशात ९९ टक्के लोकांसाठी कोरोना जीवघेणा नाही; भीतीच्या वातावरणातून बाहेर या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 07:22 IST

राहुल गांधी : स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : कोरोनाची साथ देशातील ९९ टक्के लोकांसाठी जीवघेणी नाही. या रोगाबाबत लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. आम्हाला ही भीती दूर करावी लागेल. एक अथवा दोन टक्के लोकांसाठी हा रोग नक्कीच जीवघेणा आहे. ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा गंभीर आजार आहे त्यांच्यासाठी हा रोग घातक आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी दावा केला की, देशातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी भीतीच्या वातावरणातून बाहेर निघावे लागेल. कोण भाजपचे आहे, कोण काँग्रेस अथवा अन्य पक्षांचे आहे याचा विचार न करता सर्वांच्या सहकार्याने सरकारने हे भीतीचे वातावरण समाप्त करायला हवे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल. भीतीचे वातावरण समाप्त करण्यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी मीडियाला केले.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोनावर विजय मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीयकृत मार्गाऐवजी विकेंद्रीकरणाचा मार्ग निवडावा. कारण, थेट तळागाळात धोरणे राबविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांकडे आहे. या वस्तुस्थितीची जाणीव केंद्रातील धोरण ठरविणाऱ्यांकडे नाही. ते म्हणाले की, देशातील १३ कोटी लोकांना ७५०० रुपये दिले जावेत. जर, ते शक्य नसेल तर किमान ५००० रुपये तर त्वरित मिळायला हवेत. ही रक्कम ६५ हजार कोटींएवढी असून अशक्य नाही. रोजगार आणि अर्थव्यवस्थेसाठी एमएसएमई तथा मोठ्या उद्योगांना तात्काळ आर्थिक सहकार्य आणि क्रेडिट सुविधा देण्याचे समर्थन करताना राहुल गांधी यांनी पुरवठा साखळी पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. अन्नसुरक्षा, मनरेगा, शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये टाकण्याच्या मुद्यांचा पुनरुच्चार करताना राहुल गांधी यांनी जोर देऊन सांगितले की, स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे आहे. जर ते आपल्या घरी परतू इच्छित असतील तर, त्यांना परवानगी मिळायला हवी.

लॉकडाऊनमधून बाहेर येण्याचे धोरण काय? : अमरिंदर सिंगपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यासाठी महसुलाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची रणनीती आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठीचे धोरण काय? अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, या साथीचा गरिबांना सर्वाधिक फटका बसला आहे. सामाजिक, आर्थिक जनजीवन लवकर पूर्ववत झाले नाही तर, समाजाचे मोठे नुकसान होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी