Coronavirus: लॉकडाऊनमुळे ‘हे’ दिवसही पाहायला मिळाले; चक्क नाल्यामधून वाहतेय लाखो लीटर बिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:18 AM2020-04-22T10:18:46+5:302020-04-22T10:28:27+5:30

मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या आणि कारखान्यांचे कामकाज ठप्प पडलं आहे.

Coronavirus: Coronavirus Lockdown Effect Beer Plants In Ncr Throw Over 1 Lakh Litres Of Fresh Beer In Drains pnm | Coronavirus: लॉकडाऊनमुळे ‘हे’ दिवसही पाहायला मिळाले; चक्क नाल्यामधून वाहतेय लाखो लीटर बिअर

Coronavirus: लॉकडाऊनमुळे ‘हे’ दिवसही पाहायला मिळाले; चक्क नाल्यामधून वाहतेय लाखो लीटर बिअर

Next
ठळक मुद्देलॉकडाउनमुळे बिअर कारखान्यातून हजारो लिटर ताजी बिअर टाकून दिलीताजी बिअर बाटलीबंद नसल्याने खराब होण्याची शक्यता अधिक ताजी बिअर सुरक्षित ठेवण्यासाठी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक करावा लागतो.

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या १९ हजारांच्या वर पोहचली असून ६०० पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गेल्या २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरु केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरूच आहे.

मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या आणि कारखान्यांचे कामकाज ठप्प पडलं आहे. दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोबेव्हरीज कंपनीला हजारो लिटर ताजी बिअर नाल्यांमध्ये टाकण्यास मजबूर झाले आहेत. आतापर्यंत एनसीआरमध्ये १ लाख लिटरपर्यंत ताजी बिअर टाकण्यात आली आहे. कारण लॉकडाऊनमुळे अद्याप त्या बिअर प्रकल्पात  पडून होत्या. बाटल्यांमध्ये ठेवण्यात आलं नव्हतं. ते खराब होण्यापासून वाचविण्यासाठी बिअरच्या किंमतीपेक्षा त्याचा खर्च अधिक आहे. म्हणून बिअर नाल्यामध्ये टाकून देण्यात आली.

स्ट्रायकर एन्ड सोई ७ च्या ललित अहलावत यांनी आपल्या गुरुग्रामच्या सायबर-हब आऊटलेटमधून ५ हजार लीटर बिअर नाल्यात टाकली. त्याचप्रमाणे, प्रॅन्स्टरच्या प्रमोटरला ३ हजार लीटर बिअर टाकून द्यावी लागली. या सर्वांमध्ये एनसीआरच्या मायक्रोबर्व्हरीजना सुमारे १ लाख लीटरपेक्षा जास्त ताजी बिअर बाहेर फेकावी लागली.

बाटलीबंद बिअरपेक्षा ताजी बिअर अगदी थोड्या काळासाठी चांगल्या स्थितीत राहते. ब्रूअरी सल्लागार ईशान ग्रोव्हर म्हणाले की, बिअर ताजी ठेवण्यासाठी कारखान्यात ती विशिष्ट तापमानात ठेवावी लागते आणि दररोज देखरेखीची देखील आवश्यकता असते. सामान्य दिवसात असा साठा जमा होत नव्हता. लॉकडाऊनची घोषणा ४ आठवड्यांपूर्वी झाली तेव्हा बहुतेक बिअर प्लांट्स त्यांच्या पूर्ण क्षमतेने भरले होते. तेव्हापासून हा साठा सांभाळला जात आहे. ब्रेव्हर्स म्हणतात की ही समस्या फक्त लॉकडाऊनची नाही. लॉकडाऊननंतरही व्हायरसच्या भीतीमुळे आणि सोशल डिस्टेंसिंगमुळे पूर्वीप्रमाणे बिअर शॉपवर ग्राहक परत येण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, बिअर कंपन्या होम डिलिव्हरीसाठी परवानगी मागत होती, परंतु ती देण्यात आली नाही. ग्रोव्हर म्हणाले की, परदेशात ज्याप्रमाणे ग्लास,जग किंवा ताजी बिअरची भांडी अशा गोष्टींमध्ये पॅक केल्यानंतर राज्य सरकार होम डिलिव्हरीला परवानगी देईल अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येकजण रेस्टॉरंट्समधून होम डिलिव्हरीबद्दल बोलत असतो मात्र बिअर उत्पादकांना नुकसान होत आहे. उत्पादन शुल्क विभाग फक्त मद्य दुकाने खुली करण्याबद्दल चर्चा करत आहे. त्यांची उत्पादने फार काळ खराब होत नाहीत असंही ते म्हणाले.

Web Title: Coronavirus: Coronavirus Lockdown Effect Beer Plants In Ncr Throw Over 1 Lakh Litres Of Fresh Beer In Drains pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.