शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा भयावह वेग, सलग तिसऱ्या दिवशी सापडले आठ हजारांहून अधिक रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 10:43 IST

Coronavirus In India: कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या काळात ४५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या काळात ४५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४७ हजार ९९५ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या ८ हजार ०८४ नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३२ लाख, ३० हजार १०१ एवढी झाली आहे. तर १० जणांच्या मृत्युमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ५ लाख २४ हजार ७७१ एवढी झाली आहे.

तत्पूर्वी रविवारी देशात कोरोनाचे ८ हजार ५८२ नवे रुग्ण समोर आले होते. तसेच ४ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी एकूण ८ हजार ३२९ रुग्ण समोर आले होते. सरकार कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देत आहे. देशातील कोरोनाच्या एकूण लसीकरणाचा आकडा १ अब्ज ९५ लाखांच्या वर पोहोचला आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे ७३५ नवे रुग्ण सापडले. यादरम्यान, ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी ६५५ नवे रुग्ण सापडले होते. तर २ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या २००८ एवढी झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा ४.९४ टक्के आहे.

मुंबईचा विचार केल्यास येथे रविवारी १ हजार ८०३ नवे कोरोनाबाधित सापडले.  तर एका दिवसामध्ये ९५९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली. मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ८८९ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत