शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

coronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर

By बाळकृष्ण परब | Updated: September 21, 2020 15:43 IST

मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता.

ठळक मुद्देतबलिगी जमातच्या एका कार्यक्रमामुळे देशातील काही भागात कोरोना पसरल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या २३३ सदस्यांना अटक केली तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले होते. त्यानंतर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तबलिगी जमातवर कोरोना पसरवल्याचा आरोप होऊ लागला होता. दरम्यान, तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमामुळे देशातील काही भागात कोरोना पसरल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. मार्चमध्ये दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहोचला, असे केंद्रिय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेमध्ये सांगितले.केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेमध्ये सांगितले की, दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या २३३ सदस्यांना अटक केली आहे. तसेच २९ मार्च रोजी संघटनेच्या मुख्यालयामधून २ हजार ३६१ जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी लेखी उत्तराच्या माध्यमातून राज्यसभेमध्ये ही माहिती दिली.कोरोनाचा संसर्ग सरू झाल्यानंतर विविध प्राधिकरणांनी दिलेल्या सूचना आणि आदेशांकडे दूर्लक्ष करत दीर्घकाळ मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था न करता एका बंद परिसरात मोठी सभा झाली. त्यामुळे अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.दरम्यान, कोरोनाच्या साथीच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे कारस्थान आणि मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मौलाना साद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात जाणीवपूर्वक साथ पसरवल्याचा, संभाव्य सामूहिक हत्येचे प्रयत्नांसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सरकार आणि प्रशासनाने मिळून तब्बल साडे पंचवीस हजार जमातींना शोधून शोधून क्वारेंटाइन केले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार