शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

coronavirus : कोरोनाच्या संक्रमणाचा वेग वाढला, पण इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:53 IST

देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात देशातील देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेतजगभरात प्रत्येकी 10 लाख लोकांमागे सरासरी 17.3 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू होत आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.3 एवढे आहे.

नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरात देशातील देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला आहे. तसेच देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात असलेल्या प्रयत्नांची माहिती मंत्रिमंडळाला दिली. तसेच कोरोनविरोधातील लढाईत  इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावाही मोदींनी केला. कोरोना विषाणूच्या फैलावासंबंधीची जागतिक आकडेवारी पंतप्रधानांच्या या दाव्याला दुजोरा देत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन या विकसित देशांच्या तुलनेत भारतात  कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. 

जगभरात दर दहा लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचा आकडा 267 एवढा आहे. अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचे प्रमाण 1496 एवढे आहे. तर स्पेनमध्ये 3 हजार 864, इटलीमध्ये  हजार 732 आणि फ्रांसमध्ये 2 हजार 265 एवढे आहे. तर भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेत. 

जगभरात प्रत्येकी 10 लाख लोकांमागे सरासरी 17.3 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू होत आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.3 एवढे आहे. अमेरिकेत दर दहा लाख लोकांमागे 86 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांचा विचार केल्यास हे प्रमाण स्पेनमध्ये 402, इटलीमध्ये 358 आणि फ्रांसमध्ये  261 एवढे आहे.दरम्यान, देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय