शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: काँग्रेस कार्यकारिणीची कोरोनाविषयी आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 01:26 IST

कार्यकारिणी सदस्यांसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी होणार

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढ्यातील काँग्रेसची भूमिका अधिक व्यापक करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. कार्यकारिणी सदस्यांसह काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भाजपशासित राज्यांपेक्षाही उत्कृष्टकाम करून या संकटाच्या काळात काँग्रेस इतर पक्षांपेक्षा जनतेसाठी सेवा करण्यात सरस असल्याचे दाखवून द्यावे, असा सल्ला दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.रोजंदारी करणारे मजूर, शेतकरी, मध्यम वर्गातील लोकांसह सर्व जनतेला आवश्यक मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना दिले जातील. तसेच त्यांनी आतापर्यंत कोरोनाविरोधी लढ्यात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारकडून त्यांना मिळणाºया सहकार्याचाही आढावा घेण्यात येणार आहे.निवेदनावर चर्चा करणारमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या निवेदनावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. हे निवेदन पंतप्रधान मोदी यांना सादर केले जाणार आहे.गहू, हरभरा, मोहरीच्या खरेदीसाठी पुरेशा संख्येने खरेदी केंद्र सुरूकरणे, लघु आणि मध्यम उद्योग पुनरुज्जीवित करणे, छोटे व्यापारी, रोजंदारी करणारे मजूर, मनरेगा मजूर, आशा सेविकांसह अन्य कर्मचाऱ्यांना रेशनसोबत ७५०० रुपये रोख देण्याच्या शिफारशींचा काँग्रेसच्या निवेदनात समावेश असेल. अरब देशांच्या टिपणीची दखल घेत काँग्रेस सरकारवर दबाब आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या