शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘कोरोना लसी’वरील संघर्ष; ‘आयसीएमआर’ पथक बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:26 IST

देशातील महत्त्त्वपूर्ण वैद्यकीय संशोधन संस्था असलेल्या ‘आयसीएमआर’ने कोविड-१९ विरोधातील लसीवर संशोधन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणू विरोधातील लस विकसित करण्याच्या प्रकल्पाचे नियंत्रण कोणाकडे असावे, यावरून देशातील वैज्ञानिक संस्थांत वाद उफाळून आल्यानंतर ‘आयसीएमआर’ने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेली समिती बरखास्त केली आहे.देशातील महत्त्त्वपूर्ण वैद्यकीय संशोधन संस्था असलेल्या ‘आयसीएमआर’ने कोविड-१९ विरोधातील लसीवर संशोधन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. सुमारे १00 कंपन्या आणि संस्था लस विकासात सहभागी होत्या. तथापि, आयसीएमआरचे चेअरमन डॉ. गोपाल भार्गव यांनी आता अचानक एक मेल या समितीला पाठवून समिती बरखास्त करण्यात येत असल्याचे कळविले आहे.प्राप्त माहितीनुसार, आयसीएमआरच्या पथकास जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) जोरदार आक्षेप घेतला होता. डीबीटी ही लस संशोधनातील केंद्रक संस्था आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लस संशोधनाच्या समन्वयाचे काम आपल्याकडेच राहायला हवे, असे डीबीटीचे म्हणणे होते. हा वाद शेवटी पंतप्रधानांच्या अखत्यारीतील ‘लस व औषधी विकास कृती दला’कडे गेला. कृती दलाचे नेतृत्व पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्याकडे संयुक्तरित्या आहे. पथक स्थापन करून ‘आयसीएमआर’ने अधिकार मर्यादांचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष कृती दलाने काढला.कोविड-१९ प्रकरणात ‘आयसीएमआर’ला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी ‘आयसीएमआर’ने चीनमधून आयात केलेले ‘रॅपीड अ‍ॅन्टिबॉडी कीट’ सदोष निघाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीय