शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus: रॅपिड टेस्टिंग किटमधील दोष दूर करण्याची चीनने दर्शविली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 02:13 IST

भारतात तीन लाख संच; आयसीएमआरने दाखविल्या त्रुटी

बिजिंग : कोरोनाची चाचणी करण्यासाठी चीनमधून भारतात आणलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचे निष्कर्ष चुकीचे येत असल्याचे उजेडात आल्यानंतर चीनने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या किटमधील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करू, असे त्या देशाने म्हटले आहे. चीनचे भारतातील राजदूत जी रोंग यांनी सांगितले, की चीनमध्ये बनलेल्या व निर्यात केलेल्या वैद्यकीय उपकरणाचा दर्जा उत्तमच असावा, यावर आमच्या देशाचा कटाक्ष असतो.चीनमधून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचे निष्कर्ष चुकीचे येत असून ते काही दिवस वापरणे थांबवावे, असा सल्ला इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) या संस्थेने विविध राज्यांना दिला आहे. या संदर्भात आयसीएमआरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, की रॅपिड टेस्ट किटच्या पॉझिटीव्ह सॅम्पलच्या निष्कर्षातील आकडेवारीत ६ ते ७१ टक्के इतकी तफावत आढळून येत आहे. एका राज्याकडून तक्रार येताच आयसीएमआरने आणखी ३ राज्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनीही रॅपिड टेस्ट किटचे निष्कर्ष चुकीचे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आयसीएमआरच्या तज्ज्ञ मंडळींची पथके पाठवून या किटची दोन दिवसांत नीट तपासणी करण्यात येईल. (वृत्तसंस्था)ब्रिटन, स्पेनने केली तक्रारचीनमधील ग्वांगझूयेथून ३ लाख अँटिबॉडी टेस्ट किट एअर इंडियाच्या विशेष विमानाने १८ एप्रिल रोजी भारतात आणण्यात आले. त्यानंतर ते राजस्थान व तमिळनाडूमध्ये रवाना करण्यात आले. भारतच नव्हे तर स्पेन, ब्रिटन आदी देशांनीही चीनचे रॅपिड टेस्टिंग किट सदोष असल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या