शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: स्थलांतरित कामगारांवर केंद्र तोडगा काढणार; राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 02:04 IST

गृहमंत्रालय करू शकते दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली : विविध राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्री समूहाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकांंच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी नंतर सांगितले.मंत्री समूहाने हे स्पष्ट नाही केले की, यासाठी काय मापदंड लावण्यात येणार आहेत. असे सांगितले जात आहे की, केंद्रीय गृहमंत्रालय या कामगारांबाबत नवे दिशानिर्देश घेऊन समोर येऊ शकते. या लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सरकार एक अधिकृत सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री हे विविध राज्यात अडकलेल्या कामगारांची सद्यस्थिती स्वीकारण्यास तयार नाहीत.केंद्र सरकारला असे वाटते की, राज्यांनी यावर काही तोडगा शोधावा. कोटा येथून उत्तर प्रदेशात बस सेवेसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकार तयार झाले आहेत. अन्य राज्यही अशा काही उपाययोजना करण्याची तयारी करत आहेत.केंद्राची मुख्य काळजी ही आहे की, खाणी, बंदरे, कार्गो संचलन, रस्ते निर्मिती आणि अन्य क्षेत्रातील कामासाठी कशाप्रकारे मनुष्यबळ उपलब्ध करता येईल.कामगारांची माहिती एकत्रित करण्याचे निर्देशकेंद्रीय श्रम मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत की, स्थलांतरीत कामगारांचा एक डेटा तयार करण्यात यावा. राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि अन्य काही राज्ये अशाप्रकारे काम करत आहेत.या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी श्रम मंत्रालयाने विविध राज्यात २० कंट्रोल रुम उभारल्या आहेत. मात्र, बहुतांश कॉल हे कामगारांना घरी जाण्याबाबतचे आहेत.केंद्र सरकारला अशी काळजी आहे की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील या कामगारांना परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था कशी करावी? २५ दिवसांपासून लाखो कामगार विविध राज्यात फसले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या