शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

coronavirus : कोरोनावरून केंद्र आणि ममता बॅनर्जी आमनेसामने, केंद्रीय पाहणी पथकाला रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:23 IST

कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी   केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

कोलकाता -  एकीकडे देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वाढत  असताना आता कोरोनावरून राजकारणही रंगू लागले आहे. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी   केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेल्या पथकाला कोरोनाबाधित क्षेत्राचा दौरा करण्यापासून रोखले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती या पथकातील एक सदस्याने दिली. या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, 'आम्हाला आज काही भागांचा दौरा करायचा आहे, असे आम्ही सांगितले होते. मात्र काही अडचणी आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणार नाही असे प्रशासनाने कळवले.'

इतर राज्यात गेलेल्या केंद्राच्या पथकांना त्या राज्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्या राज्यांना जी नोटीस देण्यात आली,  तीच नोटीस पश्चिम बंगालला देण्यात अली होती. दरम्यान, त्या पथकांना मात्र कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही,' असा दावाही त्यांनी केला. 

केंद्र सरकारने चार राज्यात एकूण  सहा अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके पाठवली आहेत. ही पथके महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानमधील जयपूर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, मिडणापूर पूर्व, 24 परगणा उत्तर,  दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपैगुडी आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ही पथके पाठवण्यात आली आहेत.   या शहरांमध्ये परिस्थिती गंभीर असून, तिथे लॉकडाऊनचे योग्य पालन होत नसल्याचे केंद्राचे निरीक्षण आहे. तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करून सांगितली जात असल्याचाही दावा करण्यात आहे. विशेषकरून पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करून सांगण्यात येत असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालCentral Governmentकेंद्र सरकारMamata Banerjeeममता बॅनर्जी