शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

coronavirus : ...असा साजरा करा रमजान, मोदींनी मुस्लिम बांधवाना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 1:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे.

ठळक मुद्देयावर्षी रमजान महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनवाईद येण्यापूर्वी हे जग कोरोनामुक्त व्हावे यासाठी पूर्वीपेक्षा जास्त इबादत कराकोरोनविरोधात सुरू असलेल्या लढ्यादरम्यान बेफिकीर राहून चालणार नाही

नवी दिल्ली - देशासमोरील कोरोनाविषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे. यावर्षी रमजान महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनवा, असे मोदी म्हणाले.   मोदी म्हणाले की, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. गेल्यावेळी रमजान महिना साजरा केला तेव्हा यावर्षीच्या रमजानवेळी एवढ्या संकटांचा सामना करावा लागेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्यामुळे यावर्षी रमजान महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनवा. तसेच ईद येण्यापूर्वी हे जग कोरोनामुक्त व्हावे आणि पूर्वीप्रमाणे आनंद आणि उत्साहाने ईद साजरे करता यावे यासाठी पूर्वीपेक्षा जास्त इबादत करा,' असे आवाहन मोदींनी केले. 

'तसेच रमजानच्या दिवसांत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून लोक कोरोनाविरोधातील लढाईला अजून मजबूत करतील. रस्ते, बाजार आणि मोहल्ल्यांमध्ये फिजिकल डिस्टंसिंगचे पालन होईल,' अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. कोरोनविरोधात सुरू असलेल्या लढ्यादरम्यान बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना आपल्या घरात, गल्लीत, ऑफिसात आलेला नाही म्हणजे, तो येणारच नाही असे नाही. 'सावधानी हटी, दुर्घटना घटी', असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन मोदींनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamadanरमजानNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात