शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:01 IST

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळ; जगात चौथ्या क्रमांकावर

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी कोरोनाचे ९ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आज पहिल्यांदा कोरोनाचे जवळपास ११ हजार रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत ब्रिटनला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर पोहोचला. येत्या काही दिवसांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहील, असा धोक्याचा इशारा सर गंगा राम रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा यांनी दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर थांबणार नाही. जुलैच्या सुरुवातीला किंवा मध्यावर अथवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल, असा अंदाज ब्योत्रा यांनी वर्तवला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे. मात्र कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत तरी येणार नाही, अशी शक्यता ब्योत्रा यांनी वर्तवली. याआधी दिल्ली सरकारनंदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.गेल्या महिन्यात दिल्ली सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटाबद्दलची आकडेवारी ठेवण्यात आली. १५ जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजारांपर्यंत जाईल. सध्या हा आकडा ३५ हजारांच्या जवळपास आहे. ३० जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख, १५ जुलैपर्यंत २.२५ लाख आणि ३१ जुलैपर्यंत ५.३२ लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार १९५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर साडे हजार जणांनी जीव गमावला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखाच्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतलॉकडाऊनच्या काळातील पूर्ण पगार मिळणार का?; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयलॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या