शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ३२ जवान बाधित झाल्यानंतर बीएसएफचे मुख्यालयही सील; दोन माळ्यांचे केले निर्जंतुकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:52 IST

जामा मशीद व चांदनी महल येथे बीएसएफचे एकूण ९४ जवान तैनात होते. त्यापैकी ३२ जणांना कोरोना झाला असून, हे सारे बीएसएफच्या १२६ व्या बटालीयनचे जवान आहेत

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पाठोपाठ आता सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्यालयही सील होण्याच्या मार्गावर आहे. तेथे तैनात एका हेड कॉन्स्टेबलचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, लोधी मार्गावरील सीजीओ कॉम्प्लेक्समधील मुख्यालयाचे २ माळे सोमवारी तातडीने सील करून, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बीएसएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले. आता दिल्लीतील कोरोनाबाधित बीएसएफ जवानांची संख्या ३२ झाली आहे. सर्व जवान जामा मशीद आणि चांदनी महल येथे दिल्ली पोलिसांसोबत लॉकडाऊनच्या ड्यूटीवर तैनात होते. या साऱ्यांवर आता विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू झाले असून, यांच्या संपर्कातील जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जामा मशीद व चांदनी महल येथे बीएसएफचे एकूण ९४ जवान तैनात होते. त्यापैकी ३२ जणांना कोरोना झाला असून, हे सारे बीएसएफच्या १२६ व्या बटालीयनचे जवान आहेत, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी जवळपास ८० जवानांचे अहवाल बीएसएफला प्राप्त झाले, त्यातील २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आणखी काही जणांचे चाचणी अहवाल यायचे आहेत. दिल्ली आरोग्य विभाग व पोलिसांच्या सहकार्याने या जवानांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्याचवेळी या जवानांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा स्रोत हाती लागू शकला नाही.इतर रोगांवरील उपचारादरम्यान संसर्ग?बीएसएफच्या आर. के. पूरम येथील हॉस्पिटलमध्ये ५ आरोग्यसेवकांना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले होते. तर, कर्करोगाचे दोन व मूत्रपिंडांचा आजार असलेला एक रुग्णही येथे आहे. त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये उपचारादरम्यान संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, सीआरपीएफ आणि बीएसएफ या सुरक्षा यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाच्या घटकाला कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होणे चिंतेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBSFसीमा सुरक्षा दल