शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वंदे भारत मोहिमेतील विमान तिकिटांचा काळाबाजार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:48 IST

भारतीय प्रवाशांची लुबाडणूक; एअर इंडियाकडून कडक कारवाई अपेक्षित

नवी दिल्ली : कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत सुरू केलेल्या विमानसेवेच्या तिकिटांची काही ट्रॅव्हल एजंटकडून काळ्या बाजारात विक्री होत आहे. लॉकडाऊनदरम्यान विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरू केली तेव्हाही त्यांच्या तिकिटांचा असाच काळाबाजार झाला होता.भारतीय प्रवाशांची लुबाडणूक एअर इंडियाच्या निदर्शनास काही जणांनी आणून दिल्यानंतरही या ट्रॅव्हल एजंटवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोरोना साथीमुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असली तरी वंदे भारत मोहीम ७ मेपासून सुरू आहे. एअर इंडियाची विमाने यासाठी प्रामुख्याने वापरण्यात आली. त्याद्वारे विदेशातून १३ लाख भारतीय मायदेशात परतले आहेत. मात्र, या विमानांचे तिकीट मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा प्रवासी आॅनलाइन बुकिंग करायला गेला तर सर्व तिकिटे विकली गेली आहेत अशी सूचना तिथे वाचायला मिळते. मात्र, दिल्लीतील काही ट्रॅव्हल एजंट अतिशय चलाखीने ही तिकिटे काळ्या बाजारात विकत आहेत.‘ट्रॅव्हल एजंटचे परवाने कायमचे रद्द करा’वंदे भारत सेवेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विमानांमधील तिकिटांचा काळाबाजार निदर्शनास येताच एअर इंडियाने एका पत्रकात जुलैमध्ये म्हटले होते की, गैरकृत्ये करणाºया ट्रॅव्हल एजंटवर कडक कारवाई केली जाईल. लुबाडणूक करणाºया ट्रॅव्हल एजंटचे परवाने कायमचे रद्द करावेत, अशी मागणी विदेशात अडकलेल्या भारतीयांनी केली आहे.पत्रकाराने केला पर्दाफाश३१ जुलै रोजी एअर इंडियाचे दिल्ली ते टोरँटो यादरम्यानच्या प्रवासी तिकिटाची मूळ किंमत ७५ हजार रुपये होती. एका पत्रकाराने आपण कॅ नडातील प्रवासी असल्याचे भासवून ट्रॅव्हल एजंटला संपर्क साधला असता, त्याने हे तिकीट १.७५ लाख रुपयांना मिळवून देतो असे सांगितले. ८ किंवा ९, ११ आॅगस्ट या तीन दिवसांतील तिकिटाची किंमत १.७५ लाख आहे. यातील एकही तिकीट शिल्लक नसून ती दोन किंवा सव्वादोन लाख रुपयांना विकली गेल्याचे ट्रॅव्हल एजंटने स्टिंग आॅपरेशन करणाºया पत्रकाराला सांगितले. तिकीट आरक्षणाचे काम करणाऱ्यांकडून तिकीट मिळविण्यासाठी मला खटपट करावी लागेल, असेही तो म्हणाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया