शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मोठ्ठा दिलासा, सव्वा चार महिन्यांनंतर देशात सापडले कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: December 15, 2020 11:59 IST

coronavirus: जगातील इतर काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहेगेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाक ४३ हजार ७०९ झाली आहे

नवी दिल्ली - जगातील इतर काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण सापडले असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चार महिन्यांनंतर प्रथमच देशात एवढ्या कमी संख्येने रुग्ण सापडले आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाख, सहा हजार १६५ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाक ४३ हजार ७०९ झाली आहे.अजून एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दिवसभरात देशात ३४ हजार ४७७ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत देशातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ९४ लाख २२ हजार ६३६ झाली आहे. तर सद्यस्थितीत देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३ लाख ३९ हजार ८२० आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९५. १२ टक्के एवढा झाला आहे.देशात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४३ हजार ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात ४८ हजार २६९, कर्नाटकमध्ये ११ हजार ९५४, तामिळनाडूमध्ये ११ हजार ९०९, दिल्लीमध्ये १० हजार ७४, पश्चिम बंगालमध्ये ९ हजार १००, उत्तर प्रदेशमध्ये ८ हजार ३८, आंध्र प्रदेशमध्ये ७ हजार ५९, पंजाबमध्ये ५ हजार ९८, गुजरातमध्ये ४ हजार १८२ आणि मध्य प्रदेशमध्ये ३ हजार ४१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य