शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना विरुद्धच्या संघर्षात पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा; पोलिसांची नागरिकांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 15:42 IST

CoronaVirus News: कोरोनााविरुद्धच्या लढ्यात पोलीस घेणार सर्वसामान्यांची मदत

बंगळुरू: देशातील कोरोनाचा विळखा वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बंगळुरू पोलिसांनी कोरोना विरुद्धच्या संघर्षात साथ देण्यासाठी सर्वसामान्यांना साद घातली आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा, असं आवाहन शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी केलं आहे.बंगळुरूतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनावरही ताण आला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांची मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी १८ ते ४५ वर्षांच्या व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून काम करता येईल. त्यांना 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' म्हणून सेवा देता येईल, अशी माहिती राव यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींनी http://bcp.gov.in वर जाऊन नोंदणी करावी, असं आवाहन आयुक्तांनी केलं. लॉकडाऊनला सुरुवात होताच बंगळुरूतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. मात्र आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. कर्नाटक सरकारनं शनिवारी शहर आणि ग्रामीण भागात पूर्णपणे लॉकडाऊन घोषित केला. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली आहे. काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेला लॉकडाऊन २२ जुलै पहाटे ५ पर्यंत कायम असेल. या कालावधीत केवळ रुग्णालयं, अन्नधान्य, दूध, भाज्या, औषधांची दुकानं सुरू राहतील. कर्नाटकात कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील २५ हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर १७ हजार ३९१ जणांवर सध्याच्या घडीला उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ८४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी बंगळुरूत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून त्यांचा आकडा साडे पंधरा हजारांहून अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या