शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ‘कोविड-१९’चा प्रतिबंध करण्यासाठी रुग्ण, डॉक्टरांना बीसीजी लस उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 23:10 IST

‘इंडियन जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स’मधील शोधनिबंधाचा निष्कर्ष

नवी दिल्ली : क्षयरोगावरील बीसीजी लस ही ‘कोविड-१९’चे रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी; तसेच ज्येष्ठ नागरिकांंना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टोचल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष ‘इंडियन जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स’मधील एका शोधनिबंधात काढण्यात आला आहे.

दिल्ली येथील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अजय गुप्ता यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. ‘क्षयरोगच नव्हे, तर अन्य आजारांविरोधातही लढण्यासाठी बीसीजी लस शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक भारतीयाला लहानपणीच बीसीजीची लस टोचलेली असते. मात्र, ही लस टोचणे जिथे बंद झाले आहे, अशा देशांत क्लोरोक्वीनबरोबर बीसीजीची लस दिली जाऊ शकते. बीसीजी लशीचे माणसांवर याआधीच यशस्वी प्रयोग झाले असून, ती जगात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे,’ असे या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे.बीसीजी लस उपयुक्त का?या शोधनिबंधातून काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, शरीरातील रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘सीडी ८ टी’ पेशींचे बीसीजी लसीतील ग्रॅन्यूलोमस या पेशीसमूहाशी बंध जुळतात. त्यामुळे या पेशी अधिक जोमाने विषाणूंचा प्रतिकार करू लागतात.सहा ते दहा आठवड्यांत चांगला परिणाम

शरीरातील रोगप्रतिकारशक्तीशी निगडित पेशी अतिसक्रिय होण्याचा धोका बीसीजीची लस टोचल्यामुळे टाळता येण्याची शक्यता आहे. बीसीजी लस टोचल्यानंतर, त्याचे रोगप्रतिकारशक्तीवर सहा ते दहा आठवड्यांत चांगले परिणाम दिसून येतात. त्यामधील काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आणखी काही औषधेही देता येतील, असे या शोधनिबंधाचे लेखक आॅर्थोपेडिकसर्जन डॉ. अजय गुप्ता यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या