शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 13:30 IST

लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे

ठळक मुद्देलॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक, 59 हजार 868 वाहने जप्त

चेन्नई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा देशातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाबधित रुग्णांचा आकडा आटोक्यात होता. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 485 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 59 हजार 868 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबरोबरच लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी 71 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 च्या वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून,  योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोना बाधितांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 42 टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी 100 पैकी 42 रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका 0 ते 20 वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. 41 ते 60 वयोगटातील रूग्ण 33 टक्के तर 60 पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण 17 टक्के आहेत.मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूArrestअटक