शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

CoronaVirus News: रुग्णांना उत्तम उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा गट नेमा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 4:58 AM

चाचणीचे दर सर्वत्र समान ठेवणे आवश्यक

नवी दिल्ली : ‘कोविड-१९’च्या रुग्णांवर योग्य रितीने उपचार सुरू आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व राज्यांनी तज्ज्ञ व्यक्तींचा गट स्थापन करावा तसेच प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना चाचणीचे विविध राज्यांत वेगवेगळे दर आहेत. काही राज्यांत हे दर २५०० रुपये तर काही राज्यांत ४५०० रुपये आहेत. देशात चाचणीचा समान दर असणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. न्या. अशोक भूषण, न्या. एस. के. कौल, न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली.दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात ‘कोविड-१९’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये हेळसांड झाली. रुग्णांचे मृतदेह उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या शेजारी ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना योग्य रितीने उपचार मिळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. याबद्दलही न्यायालयाने सरकारला कानपिचक्या दिल्या होत्या.चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात चर्चा सुरूकोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्यांना रुग्णालयात उत्तम उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरातने पावले उचलावीत, असा आदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना चाचणीचे दर कमी करण्यासाठी संबंधितांशी काही राज्ये चर्चा करत असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय