शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: केंद्राकडून दुसरे आर्थिक पॅकेज?; लवकरच उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:45 IST

1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज सरकारने गरीब महिला आणि वृद्धांसाठी जाहीर केले होते.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या उद्योगांसाठी दुसरे आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि प्रमुख मंत्री व अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा आणि सीतारामन यांच्याशी विचारविमर्श केला. या मुद्यावर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसारख्या प्रमुख आर्थिक मंत्रालयाच्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि ती सांभाळण्यासाठी मंत्रालयाकडून विचार करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत अर्थ मंत्रालय मोदी यांच्यासमोर एक योजना मांडणार आहे. मंत्रालयाने जीएसटीची मासिक आकडेवारी जारी करणेही टाळले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागरी उड्डयन, कामगार आदी मंत्रालयाच्या संबंधितांसोबत बैैठक घेतली. या बैठकीच्या एक दिवस अगोदर त्यांनी वाणिज्य आणि एमएसएमई मंत्रालयासोबत देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विचारविमर्श केला होता. या बैठकीला मोदी यांच्यासोबत गृहमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही उपस्थित होते.1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज सरकारने गरीब महिला आणि वृद्धांसाठी जाहीर केले होते. यामुळे लोकांची आर्थिक अडचण दूर होण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. सूत्रांनी सांगितले की, सरकार लवकरच उद्योगांसाठी दुसरे प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी