शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Coronavirus : कोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:24 IST

तर आसाम, केरळ व बिहार ही तीन राज्ये येत्या सोमवारी पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ बैठक झाली की निर्णय घेतील.

नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मे रोजी संपले तरी निदान कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी तरी त्यानंतरही निर्बंध सुरू राहावेत, अशा मतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पं. बंगाल, पंजाब, ओदिशा व दिल्ली ही सहा राज्ये आली असल्याची माहिती मिळते. गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरयाणा, हिमाचल प्रदेश व कर्नाटक या सहा राज्यांनी केंद्र जे काही सांगेल त्याप्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे. तर आसाम, केरळ व बिहार ही तीन राज्ये येत्या सोमवारी पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ बैठक झाली की निर्णय घेतील. तेलंगण या राज्याने ३ मेनंतरही ‘लॉकडाउन’ सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशात इंदूर, उज्जैन, भोेपाळ व खरगोणसह जबलपूरमध्येही ‘लॉकडाउन’ सुरू ठेवावे लागेल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वाटते.विरोधी पक्षांची सरकारे असलेली पं. बंगाल, पंजाब व ओदिशा ही राज्ये मोठा संसर्ग असलेल्या भागांत तरी ‘लॉकडाउन’चे निर्बंध ३ मेनंतरही सुरू ठेवण्याच्या विचारात आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग व ओदिशाचे आरोग्यमंत्री नवकिशोर दास यांनी संपूर्ण ‘लॉकडाउन’ इतक्यात उठविणे योग्य होणार नाही, असे म्हटले आहे.>आज मुख्यमंत्र्यांशी चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यात लॉकडाउनबाबत महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री काय मत मांडणार, त्याआधारे ३ मेनंतर काय करायचे, याचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे कळते.>महाराष्ट्र : ९२ टक्के कोरोनाबाधित रुग्ण मुंबई व पुणे महानगर क्षेत्रांमध्ये आहेत.ही क्षेत्रे ‘कन्टेनमेंट क्षेत्रे’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे म्हणाले की, ‘लॉकडाउन’ वाढविण्यासंबंधीचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडीओ बैठकीनंतर घेतला जाईल. ३ मे नंतर गरज पडल्यास संपूर्ण मुंबई व पुण्यात नाही तरी निदान तेथील ‘कन्टेनमेंट झोन’मध्ये तरी आणखी १५ दिवस निर्बंध कायम ठेवावे लागतील. - डॉ. राजेश टोपे>केंद्रीय गृह मंत्रालयाने काही भागातील ठरावीक दुकाने सुरू करण्याची मुभा दिली असली तरी महाराष्ट्राने तशी परवानगी अद्याप दिलेली नाही. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस