शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

दुःखाचा डोंगर! कोरोनामुळे आईचा मृत्यू, 4 मुलं झाली अनाथ; 7 वर्षांच्या अंकुशवर आली कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 12:37 IST

आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबातील काजल, रूबी, रेनू उर्फ सुबी आणि अंकुश अनाथ झाले आहेत. सात वर्षांच्या अंकुशवर खेळण्याच्या वयातच आईचे श्राद्ध कर्म करण्याबरोबर, आपल्या भावंडांच्या पालन-पोषणाचीही मोठी जबाबदारी आली आहे.

बलिया - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बैरिया तालुक्यात असलेल्या दलनछपरा गावात कोरोनाने एकाच कुटुंबातील चार मुलांना अनाथ केले. यामुळे, सध्या शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असेलल्या अवघ्या सात वर्षांच्या अंकुशवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. आता त्याला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आईचा तेरावाही करायचा आहे आणि आपल्या तीन बहीण-भावांचा सांभाळही करायचा आहे. (CoronaVirus After mother death due to corona 7 year old to look after his siblings ballia)

कोरोनाच्या थैमानाने जिल्ह्यातील बहुतेरे कुटुंबातील हसते-खेळते वातावरण नष्ट केले. बिहारच्या सीमेपासून साधारणपणे 50-55 किलोमिटर अंतरावर असलेल्या दलनछपरा गावातील अंकुशचे वडिल संतोष पासवान यांचा तीन वर्षांपूर्वीच कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी अंकुशच्या आईचाही कोरोनाने बळी घेतला.

CoronaVirus News: तुमची आई गेली! रुग्णवाहिका चालकाला रात्री आला कॉल; त्यानंतर त्यानं जे केलं ते वाचून कौतुक कराल

आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबातील काजल, रूबी, रेनू उर्फ सुबी आणि अंकुश अनाथ झाले आहेत. सात वर्षांच्या अंकुशवर खेळण्याच्या वयातच आईचे श्राद्ध कर्म करण्याबरोबर, आपल्या भावंडांच्या पालन-पोषणाचीही मोठी जबाबदारी आली आहे. मात्र, अंकुशही कुटुंबाची जबाबदारी उचलायला तयार आहे. या कौवळ्या वयातही त्याने हिंमत हारलेली नाही. तो म्हणतो, की आपल्या सारख्यांकडून मदत मागून पुढील शिक्षण पूर्ण करू आणि पोलीस होऊ. मात्र, अंकुशच्या बहिणींचे म्हणणे आहे, की आता सर्व काही देवाच्याच हाती आहे. आम्ही दुसऱ्यांच्या शेतात मोल मजुरी करून दिवस काढू, असे त्या म्हणतात.

दिलासादायक! राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षाही खाली

आजीच्या विधवा पेन्शनवर चालते घर - या प्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेसंदर्भात जिल्हाधिकारी अदिति सिंह यांना विचारले असता, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे, की या चारही अनाथ मुलांचा सांभाळ त्यांची आजी फुलेश्वरी देवी विधवा पेन्शनच्या स्वरुपात मिळणाऱ्या पैशांतून करतात. महत्वाचे म्हणजे, राज्यात पात्र, महिलांना दर महा विधवा पेन्शनच्या रुपात केवळ 500 रुपयेच मिळतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारcollectorजिल्हाधिकारी