शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचे नवे ८३ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह ६ राज्यांत; रुग्णवाढीने चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 07:14 IST

केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये अधिक खबरदारीच्या सूचना

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांमधील ८३.१४ टक्के महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या राज्यांत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक २७ हजार १३६, पंजाब २ हजार ५७८ आणि केरळमध्ये २ हजार ७८ नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये १ हजार ७९८, गुजरातमध्ये १ हजार ५६५ तर मध्य प्रदेशमध्ये १ हजार ३०८ नवे बाधित आढळले आहेत. हा संसर्ग वाढू लागल्याने पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात शा‌ळा बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणि लॉकडाऊनसारखे निर्बंध पुन्हा लागू करावे लागत आहेत.

रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे नागरिकांकडून कोरोना निर्बंधांचे पालन करण्यात होत असलेली उदासिनता हेच असल्याचे दिसून येत आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, नागरिकांना सध्या कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला असे वाटत आहे. खरेतर लोकांनी आणखी काळ गरज नसताना प्रवास करणे टाळले पाहिजे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोना निर्बंध काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना तपासणी चाचण्यांचा प्रमाण वाढवण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या