शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

coronavirus : 24 तासांत देशात सापडले 826 नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12,759

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 20:23 IST

गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांचा आकडा सरासरी हजाराने वाढत आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताजा आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 826 नव्या कोरोनाबाधितांची नोंद देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 759 वर पोहोचला आहेआतापर्यंत 1515 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली

नवी दिल्ली - लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग यांचे पालन होत असतानाही  देशातील कोरोनाबधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताजा आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 826 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 759 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 1515 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. 28 मार्च रोजी देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एक  हजारावर पोहोचला होता. त्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांचा आकडा सरासरी हजाराने वाढत आहे. 

दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनविरोधातील लढाईत  इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावा मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. कोरोना विषाणूच्या फैलावासंबंधीची जागतिक आकडेवारी पंतप्रधानांच्या या दाव्याला दुजोरा देत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन या विकसित देशांच्या तुलनेत भारतात  कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. 

जगभरात प्रत्येकी 10 लाख लोकांमागे सरासरी 17.3 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू होत आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.3 एवढे आहे. अमेरिकेत दर दहा लाख लोकांमागे 86 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांचा विचार केल्यास हे प्रमाण स्पेनमध्ये 402, इटलीमध्ये 358 आणि फ्रांसमध्ये  261 एवढे आहे. 

जगभरात दर दहा लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचा आकडा 267 एवढा आहे. अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचे प्रमाण 1496 एवढे आहे. तर स्पेनमध्ये 3 हजार 864, इटलीमध्ये  हजार 732 आणि फ्रांसमध्ये 2 हजार 265 एवढे आहे. तर भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत