शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मोदी सरकारच्या योजनांचा ८१ कोटी जनतेला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 07:04 IST

लॉकडाऊनदरम्यान २० हजार कोटी रुपये थेट लोकांना दिले गेले. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना ७,५५१ कोटी रुपये दिले. मनरेगाचे ७,३०० कोटी रुपये मजुरांच्या खात्यात पाठवले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर खूपच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंगा काहीशी उलटी वाहत आहे. सगळे गावांकडे जात आहेत. यामुळे काय फरक पडला?उत्तर : आम्ही हे निश्चित करीत आहोत की गावात राहणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पैसे आणि अन्न याची कमतरता भासू नये. लॉकडाऊनदरम्यान २० हजार कोटी रुपये थेट लोकांना दिले गेले. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना ७,५५१ कोटी रुपये दिले. मनरेगाचे ७,३०० कोटी रुपये मजुरांच्या खात्यात पाठवले. जनधन योजनेंतर्गत २०.४० कोटी महिलांच्या खात्यात १०,२०० कोटी रुपये पोहोचवले गेले.प्रश्न : ग्रामीण भागातील किती लोकांना फायदा होत आहे?उत्तर : ग्रामीण भागातील जवळपास ८१ कोटी जनतेला फायदा होत आहे.प्रश्न : अशा योजनांचे बनावट अनेक लाभार्थी आहेत, त्यावर काय उपाययोजना? शहरी मजुरांसाठी काय?उत्तर : सर्व योजनांच्या लाभार्थींची माहिती आमच्याकडे आहे. १० कोटी पीएम किसान, १२ कोटी मनेरगा, ६३ लाख बचत गटाशी संबंधित ६ कोटी महिला लाभार्थी असून २० ते ४० कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे.प्रश्न : कृषी मंत्रालयापुढील आव्हाने?उत्तर : सरकारने सुरुवातीपासून शेतकरी अािण शेतीकामासाठी लॉकडाऊनमधून सूट दिलेली आहे. डाळी, धान्य, गव्हाची सोंगणी ७० टक्के पूर्ण झाली आहे.प्रश्न : शेतमाल बाजारात आणणे मोठी समस्या झाली आहे काय?उत्तर : तीन महिन्यांसाठी मंडई अ‍ॅक्टमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी कुठेही शेतमाल विक्री करू शकतील.प्रश्न : महाराष्ट्रात आंबा, काश्मिरात सफरचंद उत्पादकांचे नुकसान झाले आहे.उत्तर : शेतकºयांना थेट फूड प्रोसेसिंग प्रकल्पांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.प्रश्न : खरेदीत काही समस्या? पंजाब आणि महाराष्ट्रात कामगारांची कमतरता आहे. यावर मंत्रालय काय करीत आहे?उत्तर : खरेदी चांगली सुरू आहे. पूर्वी राज्य प्रस्ताव पाठवीत होते. लॉकडाऊनच्या काळात आम्ही राज्यांना विना प्रस्तावाचीच मंजुरी दिली. खरेदीत काही समस्या येऊ नये म्हणून मशिन्सचा उपयोग वाढविला आहे. पंजाब, हरयाणातील शेतकरी संपन्न आहे. तिथे पर्याप्त संख्येने मशीन आहेत. महाराष्ट्रातही समस्या नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या