शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ८० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ किलो मोफत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 06:22 IST

CoronaVirus: केंद्राचा मदतीचा हात; मे, जूनसाठी योजना. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविल्याने नागरिकांचे जीणे असह्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ८० कोटी गरीब जनतेला मे व जून महिन्यात मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्येक लाभार्थीला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येईल.

यासंदर्भात केंद्र सरकारने निवेदनात म्हटले आहे की, ८० कोटी लोकांना दोन महिने मोफत अन्नधान्य देण्यासाठी २६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका देशातील गरीब तसेच गरजू लोकांना बसत आहे. त्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी मे व जून महिन्यात गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींना तांदूळ, गहू यासारखे ५ किलो धान्य पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना देशातील गरिबांना पोटाला पुरेल इतके पौष्टिक अन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच मोफत अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे.

पुनरावृत्ती नकोn कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक आहे. त्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमुळे उद्योग व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगार गमावल्याने गरिबांचे हाल होत आहेत. n पहिल्या लाटेत स्थलांतरित मजुरांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनही आम्ही सतर्क आहोत, असा मोदी सरकारचा दावा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार