नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या समृद्ध व दाट लोकसंख्या असलेल्या चार राज्यांमध्येच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ७८ टक्के रुग्ण केवळ याच चार राज्यांत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात व तामिळनाडूत दररोज नवे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.
चारही राज्यांना व्यापारी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्व असल्याने अर्थकारणही संकटात सापडले असून, आता त्यावर अर्थ मंत्रालयात बैठका सुरू आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे अन्य १३ राज्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. गेल्या ७ ते १३ दिवसांमध्ये एकही नव्या कोरोनाबाधिताचे निदान न झाल्याने १८० जिल्ह्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.एम्सच्या संचालकांनी जुलै मध्यात भारतात रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याचे भाकित वर्तवले असले तरी सद्यस्थितीत आपण ही वाढ रोखू शकू , असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. केवळ तीनच दिवसात १० हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने आता केंद्र व राज्य सरकारची चिंता वाढली आहे.
मुंबईत कोरोनाचा कहर अद्याप आटोक्यात आला नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टसिंग, संपर्क तपासणे, तात्काळ चाचणी करणे यावर भर द्यायला हवा, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सुचवले. मात्र एकही चूक संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फेरेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमधील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.अनेक तज्ज्ञ, संस्थांनी भारतात कोरोना प्रसाराचा अभ्यास केला. काही अदांज वर्तवले. त्याचे विश्लेषण एका विशिष्ट स्थितीवर आधारीत आहे. सद्यस्थितीत हे सारे अदांज असले.गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३९० नवे रुग्ण देशात आढळले, तर १०३ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या५६३४२ झाली आहे.