शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

CoronaVirus : चार वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण; खोकला, सर्दीसह पोटात भरले पाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:57 IST

CoronaVirus : या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.

नोएडा : जवळपास एक महिन्यानंतर मंगळवारी नोएडा येथील चाइल्ड पीजीआयमध्ये चार वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आले. या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर कुटुंबांनी त्याची तपासणी केली. यावेळी चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर या मुलाला सेक्टर-29 मधील भारद्वाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी येथील सेक्टर-30 मधील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक अँड पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग इन्स्टिट्यूट (चाइल्ड पीजीआय) येथे पाठविण्यात आले.

बर्‍याच दिवसानंतर कोरोनाची लागण झालेला लहान वयाचा रुग्ण आढळल्यामुळे रुग्णालय आणि आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. चाइल्ड पीजीआयच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना मदन यांनी सांगितले की, मुलाला दुपारी एक वाजेच्या सुमारास रुग्णालयात आणले गेले, त्यानंतर त्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता त्याला वॉर्डात दाखल करण्यात आले. मुलाला तीव्र ताप, खोकला आणि सर्दी आहे. तसेच, पोटात पाणी भरले आहे.

दिलासादायक बातमी अशी आहे की, या मुलाची ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या मुलाला झालेल्या कोरोनाचा व्हेरिएंट शोधण्यासाठी त्याचे नमुने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) चाचणी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी येथील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे दिसून येतात?ताप,  खोकला,  श्वास लागणे,  थकवा,  घसा खवखवणे,  अतिसार,  गंध कमी होणे,  चव कमी होणे, जठरासंबंधी आजाराची लक्षणे, मळमळ,  उलट्या होणे,  डोकेदुखी,  कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग - जागतिक आरोग्य संघटनाकोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जगातील जवळपास 104 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. या वेगाने पसरणार्‍या व्हेरिएंटमुळे (Coronavirus Variant) मृत्यू आणि संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा व्हेरिएंट लवकरच जगभरात पसरू शकतो, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. डेल्टा आणि इतर वेगवान संसर्ग होणाऱ्या व्हेरिएंट प्रकरणांची विनाशकारी लहर चालत आहे, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भरती आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य उपायांसह व्हायरसच्या सुरुवातीच्या लाटेंचा प्रतिकार करणाऱ्या देशांमध्ये आता उद्रेक झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य