शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशभरात दिवसात ३,९०० रुग्ण; १९५ मृत्यू; आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 03:46 IST

वेळेत रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क तपासणे, त्या सर्वांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करणे हाच कोरोनाविरोधातील सर्वांत प्रभावी मार्ग आहे

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांत ३,९०० नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही दिवसभरातील सर्वाधिक आकडेवारी असल्याने केंद्र सरकारची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय दिवसभरात कोरोनाग्रस्त १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.असे असले तरी काही राज्यांकडून रुग्ण व मृत्यू होणाऱ्यांची माहिती देण्यास विलंब होत असल्याने हा आकडा वाढलेला दिसतो, असे मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. काही भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिथे रुग्ण जास्त आहेत तेथे मृत्यूदरही जास्त होण्याची भीती आहे. मात्र, तूर्त भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित असल्याचा पुनरुच्चार अगरवाल यांनी केला.

सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक २७.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरातील आकडेवारी देताना अगरवाल म्हणाले, अनेक राज्यांकडून माहिती येण्यास विलंब होतो. त्यामुळे एकाच दिवशी हा आकडा जास्त दिसतो. रुग्ण दुप्पट होण्याचे सरासरी प्रमाण मात्र कमी होत आहे. आधी ३.४ दिवसांमध्ये रुग्णसंखा दुप्पट व्हायची. लॉकडाउनमुळे हा दर आता १२ दिवसांवर आला आहे.

वेळेत रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क तपासणे, त्या सर्वांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करणे हाच कोरोनाविरोधातील सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे राज्यांनी याकडे लक्ष द्यावे. रुग्ण आढळणे, त्याचे संपर्क तपासणे व उपचार सुरू करणे यात काही राज्यांमध्ये जास्त वेळ लागत असून, तो कमी करायला हवा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे. देशात सध्या ३२,१३८ रुग्णांवर उपचार सुरू असून १४,१४२ जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यापैकी १,०२० सोमवारी घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात सर्वाधिक २७.४१ वर पोहोचले आहे.मायदेशी आणण्याची सेवा सशुल्कपरदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ही सेवा सशुल्क असेल. परदेशातून येणाºया भारतीयांना १४ दिवसदेखील सशुल्क क्वारंटाइन करावेच लागेल. अशांची कोराना चाचणी होईल. क्वारंटाइन पूर्ण झाल्यावर पुन्हा चाचणी होईल. राज्य सरकारांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांसाठी धावली रेल्वेकामगार दिनापासून देशभरात ६२ विशेष रेल्वे गाड्यांमधून ७० हजारांवर स्थलांतरित मजूर स्वगृही परतले. मंगळवारी मजुरांसाठी १३ विशेष श्रमिक रेल्वे गाड्या धावल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.नवी कार्यसंस्कृतीकेंद्रीय गृह मंत्रालयाने तिसºया लॉकडाउनमध्ये दिलेल्या सवलतींवर पुन्हा स्पष्टीकरण दिले. कार्यालयांमध्ये कमी उपस्थिती, फेस मास्क, दोन फूट अंतर, आरोग्य सेतू अ‍ॅप व फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नाही, असे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या. खासगी कार्यालयांमध्ये एकाच वेळी जेवणाची सुटी नको. दोन वेळा ठरवाव्यात. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व स्क्रीनिंग सक्तीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.जगातही चढता आलेखजगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ लाख ९८ हजारांवर गेली असून, मृतांचा आकडाही २ लाख ५६ हजार २४० पर्यंत गेला आहे. त्यात अमेरिकेतील ७० हजार मृतांचा समावेश आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, तिथे आतापर्यंत २९ हजार जण मरण पावले आहेत.स्पेन, इटली आणि फ्रान्समध्येही मृतांची संख्या २५ हजारांहून अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या