शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...म्हणून ३० एप्रिल आणि १५ मे अधिक काळजीच्या तारखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:12 IST

सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना; कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते

- अतुल कुलकर्णीमुंबई : ३० एप्रिल आणि १५ मे या दोन तारखा अधिक काळजीच्या असल्याचे केंद्र सरकारने कळविले असून या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते अथवा कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे अधिक सतर्क राहा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण ज्या तारखांना आढळत गेले त्यानुसार केंद्रीय आरोग्य विभागाने त्याची एक सायकल तयार केली असून त्यानुसार या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. ज्या ठिकाणी १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्या ठिकाणची संख्या वाढत आहे ते भाग रेड झोन, तर ज्या ठिकाणी १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढलेली नाही ते भाग ऑरेंज झोनमध्ये आणि जेथे गेल्या २८ दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही व आहे ते रुग्णही पूर्णपणे बरे झाले आहेत, तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. रुग्णांची आकडेवारी विभागवार सतत बदलत आहे त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झोनमध्ये ठेवायचे हे अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

एखादा जिल्हा रुग्ण नाहीत म्हणून ग्रीन झोन केला आणि त्यात अचानक रुग्ण वाढू लागले तर त्या जिल्हाचा झोन बदलला जाईल. किंवा एखाद्या जिल्ह्यातील एखाद्या भागात, अथवा गावात अचानक रुग्ण वाढले किंवा समोर आले तर त्यांना कन्टेन्मेंट झोन करण्याचे अधिकार ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे उद्यापासून जी शिथीलता काही भागात आणली जात आहे, त्याचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.

ग्रीन झोन मृत ज्वालामुखीजे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत ते मृत ज्वालामुखी आहेत, त्यांना जिवंत करू नका आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत ते निद्रिस्त ज्वालामुखी आहेत, त्यांना जागे करू नका. जे रेडमध्ये आहेत ते जागृत ज्वालामुखी आहेत ते भाग मृत ज्वालामुखी बदलायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.इतर रुग्णांची काळजी घ्याजिथे इतर प्रकारच्या रुग्णांना उपचार मिळत नसतील तर तातडीने जिल्हाधिकाºयांनी हस्तक्षेप करावा, मानसूनपूर्व कामे करण्याचे नियोजन करा, नाहीतर कोरोनातून बाहेर पडू आणि पुरात सापडू अशी वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या