शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सात दिवसांत आढळले २,६०,७४२ नवे रुग्ण; आठवड्याभरात ८४ हजार सक्रिय रुग्णांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 03:17 IST

गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील २१ हजार १८० रुग्ण बरे झाले असून, २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही महाऱाष्ट्राची संख्या अधिक आहे. देशातील २१२ कोरोनाबळींमध्ये ९९ रुग्ण हे एकटे महाराष्ट्रातील आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर जगभरात वाढत असताना, लॉकडाऊन सुरू करण्याआधी देशभरात पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी कोरोनाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये भारतात ४६ हजार ९५१ नवे रुग्ण आढळले असून, त्यातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातील नव्या रुग्णांचे प्रमाण ८४.४९ टक्के आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले असून, सध्या देशात ३,३४,६४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण सध्या २.८७ टक्क्यांवर आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील २१ हजार १८० रुग्ण बरे झाले असून, २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही महाऱाष्ट्राची संख्या अधिक आहे. देशातील २१२ कोरोनाबळींमध्ये ९९ रुग्ण हे एकटे महाराष्ट्रातील आहे.

राज्यात २४ हजारांहून अधिक नवे रुग्ण

राज्यात मागील काही दिवसांत सातत्याने दैनंदिन रुग्ण निदानांत उच्चांक गाठला जात होता. सोमवारी यात किंचित घट होऊन दिवसभरात २४ हजार ६४५ रुग्ण निदान झाले असून, ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे; मात्र चिंतेची बाब म्हणजे, राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला असून, सध्या २ लाख १५ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५ लाख ४ हजार ३२७ झाली असून, बळींचा आकडा ५३,४५७ झाला आहे. दिवसभरात १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २२ लाख ३४,३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात १५ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ५४७ इतकी होती, हे प्रमाण आठवडाभरात वेगाने वाढून २२ मार्च, सोमवारी ही संख्या २ लाख १५ हजार २४१ झाली. मागील आठवड्याभरात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत ८४ हजार ६९४ ने वाढ झाली आहे. ११ मार्च रोजी राज्यात १ लाख ६ हजार ७० रुग्ण उपचाराधीन होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या