शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: एकाच घरातील तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:28 IST

जयपूरमधील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारच्या जवळ

जयपूर: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. अनेक राज्यांमधील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राजस्थानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेगानं फैलाव होत आहे. त्यातच आता राजधानी जयपूरमधील एकाच घरात कोरोनाचे तब्बल २६ रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. जयपूरच्या सुभाष चौक परिसरात आज सकाळी एकाच कुटुंबातील २६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. जयपूरमध्ये पहिल्यांदाच एकाच घरात कोरोनाचे इतके रुग्ण आढळून आले आहेत. या घरातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं दोनच दिवसांपूर्वी निष्पन्न झालं होतं. राजधानी जयपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. जयपूरमधील रुग्णांची संख्या २ हजार ३२१ वर पोहोचली आहे. राजस्थानमधील प्रमुख शहरांमध्ये आधीपासूनच कोरोनाचे रुग्ण आढळून येते. आता यामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आतापर्यंत रुग्ण न सापडलेल्या भागांतही कोरोना विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानातील कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेली आहे. जयपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर जोधपूर (१८८७), भरतपूर (७६२), पाली (६०२), उदयपूर (५८७), कोटा (५३०), नागोरचा (५०३) क्रमांक लागतो. राज्यात आतापर्यंत ८ हजाराहून अधिक जण बरे झाले असून २५१ जणांचा मृत्यू झाला आहे. Unlock 1: मुंबईकरांनो, दुकानं, ऑफिस, शाळा, कॉलेजसाठीची नवी नियमावली जाणून घ्यामुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या