शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं करतायेत ‘वर्क फ्रॉम होम’? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 08:44 IST

कोरोनातून बरे झालेले आणि रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर पंतप्रधानांची करडी नजर असते.

ठळक मुद्देकोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहिती दिली जाते. वाराणसी मतदारसंघतील लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.घरातून बाहेर पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकांना आवाहन

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. पंतप्रधानांपासून ते गावातील खेड्यातील व्यक्तीपर्यंत सर्वांनीच विनाकारण घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. ७, लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानातून त्यांचे काम सुरु आहे. मोदी पंतप्रधान कार्यालयात जात नाहीत. घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेतात. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करणारी दोन्ही भाषणं ही त्यांच्या निवासस्थानातूनच झाली.

मुख्य सचिव पी. के मिश्रा, कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा, आरोग्य सचिव प्रिती सूदन आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासारखे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात बैठक घेतात. दिवसभराचा आढावा या बैठकीत घेण्यात येतो.

प्रत्येक आकडेवारीवर करडी नजर

कोरोनातून बरे झालेले आणि रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर पंतप्रधानांची करडी नजर असते. मंगळवारी सकाळपर्यंत असे ३७ रुग्ण आढळले. इकोनॉमिक्स टाइम्सशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहिती दिली जाते. कारण भारताकडे कोरोना व्हायरसच्या रुग्णांना बरे करण्याची क्षमता आहे असा विश्वास लोकांमध्ये राहावा. त्याचसोबत या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अधिकारी सोशल  डिस्टेंसिंगचं पालन करतात. अनेक राज्यांमध्ये केलेली प्रवेशबंदीमुळे जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतात.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान कॉर्पोरेट प्रतिनिधी, फार्मा उद्योगाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया आणि डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना यांच्याशी बैठक घेतात. येत्या काही दिवसांत अशा प्रकारच्या आणखी बैठका होणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीएम मोदी स्वत: मिळालेल्या माहितीकडे लक्ष देत आहेत. पंतप्रधान बुधवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघतील लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी