नवी दिल्ली: पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आलं आहे. नोएडातल्या तीन मुलांसह सहा जणांचे नमुनेदेखील चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं चाचणी अहवालातून समोर आलं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सहा जणांना पुढील १४ दिवस त्यांच्या घरात कुटुंबीयांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्यांच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 11:55 IST
देशात आतापर्यंत २१ जणांना कोरोनाची बाधा
Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
ठळक मुद्देदेशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २१ वरइटलीहून आलेल्या पर्यटकांना आयटीबीपीच्या छावणीत हलवलंनोएडामधील कोरोनाच्या ६ संशयितांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह