शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आशियाई विकास बँकेकडून दीड अब्ज डॉलरचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 06:15 IST

साथीला प्रतिबंध करणे व आळा घालणे तसेच गरीब व दुर्बल समाजवर्गांना मदत करणे यासारख्या अग्रक्रमाच्या कामांसाठी हे कर्ज प्रामुख्याने असेल.

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी आशियाई विकास बँकेने मंगळवारी भारताला १.५ अब्ज डॉलरचे (सुमारे ११,३७५ कोटी रुपये) कर्ज मंजूर केले. साथीला प्रतिबंध करणे व आळा घालणे तसेच गरीब व दुर्बल समाजवर्गांना मदत करणे यासारख्या अग्रक्रमाच्या कामांसाठी हे कर्ज प्रामुख्याने असेल.कर्जाच्या अटींनुसार कोरोनाविरुद्धच्या युद्धात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचाही यात समावेश आहे. कर्जाची सुमारे ६५ टक्के रक्कम गरीब व महिलांसह समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा व थेट आर्थिक मदत देण्यासाठी असेल.बँकेने गरजू देशांना मदत करण्यासाठी ‘कोविड-१९ अ‍ॅक्टिव रिस्पॉन्स अ‍ॅण्ड एक्स्पेंडिचर प्रोग्राम’ (केअर्स) नावाचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कर्ज देण्यात येत असून त्यातून संबंधित देशातील आरोग्यसेवा सुधारणे व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्प उत्पन्नधारी व्यक्ती व बांधकाम कामगार अशा आठ कोटींहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा दिली जाईल. कोरोनाला आळा घालण्यासाठी भारताने योजलेल्या उपायांचे कौतुक करून बँकेचे अध्यक्ष मसात्सुगा असाकावा यांनी म्हटले की, भारताच्या प्रयत्नांना पूर्णपणे मदत करण्यास बँक कटिबद्ध आहे.>जागतिक बँकेचीही मदतयाआधी जागतिक बँकेने २५ विकसनशील देशांमधील कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी १.७ अब्ज डॉलरचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. यापैकी सुमारे निम्मा निधी भारताला मिळणार आहे. पुढील १५ महिन्यांत विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलर कोरोनासाठी उपलब्ध करून देण्याची योजनाही बँकेने जाहीर केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या