CoronaVirus : देशात गेल्या १२ तासांत कोरोनाचे १३१ नवे रुग्ण, मृतांचा आकडा पोहोचला ५० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 10:59 AM2020-04-02T10:59:17+5:302020-04-02T11:04:18+5:30

CoronaVirus : देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे. मात्र, यामधील १५१ रुग्ण बरे झाले आहेत.

CoronaVirus: 131 new Corona patients in last 12 hours, death toll reaches 50 rkp | CoronaVirus : देशात गेल्या १२ तासांत कोरोनाचे १३१ नवे रुग्ण, मृतांचा आकडा पोहोचला ५० वर

CoronaVirus : देशात गेल्या १२ तासांत कोरोनाचे १३१ नवे रुग्ण, मृतांचा आकडा पोहोचला ५० वर

Next

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतित आहे. भारतात सुद्घा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १२ तासांत भारतात १३१ नवे रुग्ण आढळले आहेत. 

देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे. मात्र, यामधील १५१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १७६४ इतका झाला आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. 

याशिवाय, कोरोनाच्या फैलावाचा वेग जगभरात कायम असून, जगभरातील कोरोनाबधितांचा आकडा 9 लाख 35 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजार 192 झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे काल एका दिवसात जगभरात 4 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अमेरिकेत एका दिवसात 1049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर युरोपमधील इटली आणि स्पेनमध्येही कोरोनाचे थैमान सुरू आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा 13 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 923 जणांचा मृत्यू झाला. तसेच 9 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळल्याने स्पेनमधील कोरोनाबधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 118 पर्यंत पोहोचला आहे. 

Web Title: CoronaVirus: 131 new Corona patients in last 12 hours, death toll reaches 50 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.