शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 12 कोटी भारतीयांनी गमावली नोकरी, 'ही' कौशल्यं पुन्हा मिळवून देतील रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 20:31 IST

CoronaVirus News: कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून अनेकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलीय..

मुंबई: जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.कोरोनामुळे ३.७५ कोटी विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे विविध कौशल्य आत्मसात करून विद्यार्थी शिक्षणाशी सुसुंगत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती कोर्सेरानं दिली. 'अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संस्थांनी कौशल्स विकासावर भर द्यावा. त्यामुळे लोक कामावर परतताच ते सुरळीतपणे काम सुरू करू शकतील', असा दावा कोर्सेरानं केला.व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सशी संबंधित कौशल्यं येत्या काळात अतिशय उपयुक्त ठरतील, असा दावा कोर्सेरानं केला आहे. 'सरकारं, कंपन्या आणि कॅम्पस यांच्याकडून होणाऱ्या दोन तृतीयांश नोंदण्या व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स कोर्सेसशी संबंधित आहेत,' अशी माहिती कोर्सेरानं दिली.डेटा स्किल कमी असल्यानं देशाला दरवर्षी ३३२ बिलियनचा फटकाडेटा स्किल्सच्या बाबतीत भारत कमी पडतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांना दरवर्षी ३३२ बिलियनचा फटका बसतो, अशी माहिती ऍकसेंचर आणि क्यूलिकच्या अहवालातून समोर आली आहे.भारत डेटा सायन्स स्किलमध्ये, विशेषत: डेटा व्यवस्थापनात मागे पडतो. याबाबतीत भारत जगात ५१ व्या (मागे पडण्याच्या बाबत) स्थानी आहे. तर डेटा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत देशाचा क्रमांक जगात ५८ वा आहे. भारत यामध्ये नायजेरिया, फिलिपिन्सपेक्षा थोडा पुढे असल्याचं कोर्सेराचा अहवाल सांगतो. आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन अशा वैयक्तिक कौशल्यांच्या मागणीत १२०० टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारीदेखील अहवालात आहे.व्यवसाय तंत्रज्ञानात भारताची आघाडीव्यवसाय आणि तंत्रज्ञान कौशल्यात भारत चीनपेक्षा पुढे आहे. याबाबतीत भारताला उदयोन्मुख गटात (जगात ३४ वा क्रमांक) स्थान मिळालं आहे. तर चीन ४५ व्या स्थानी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताचा समावेश उदयोन्मुख गटात असून देश जगात ४० व्या क्रमांकावर आहे. यातही भारतानं चीनला मागे टाकलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन ५० व्या स्थानी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या