शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

देशात कोरोनाचा प्रचंड कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:57 IST

दिवसात २९४ बळी । एकूण रुग्ण २.३६ लाखांवर; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना साथीने माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नाहीत. या आजाराने शुक्रवारी २९४ जणांचा बळी घेतला. याआधी देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मरण पावले नव्हते. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. एकाच दिवसात सुमारे १० हजार रुग्ण वाढल्याचा हा परिणाम आहे.

देशात १ लाख १५ हजार ९४२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर १ लाख १४ हजार ७२ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांत भारतामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. या साथीमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाची साथ देशामध्ये जून किंवा जुलै महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तोपर्यंत या साथीचा खूप फैलाव होऊन बळींची संख्याही कदाचित बरीच वाढलेली असेल. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये २८ हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये २६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये १९ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.भारतात मृत्यूदर २.८%चीनमध्ये कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ४ हजारांपेक्षा अधिक आहे. यापेक्षा भारतात जास्त बळी गेले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे ८४ हजार रुग्ण होते. एकट्या महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आताच ८० हजारांवर गेली आहे. जगभरात सुमारे ६८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ३ लाख ९८ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. या आजारापायी जगभरात ५.८ टक्के इतका मृत्यूदर असताना भारतात मात्र त्याचे प्रमाण २.८ टक्के च आहे. भारतामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे दररोज सरासरी २३९ जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवडाभरात देशात कोरोनामुळे दररोज सरासरी १७९ जणांचा मृत्यू झाला होता.भारत सहाव्या स्थानीजगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत गुरुवारी सातव्या स्थानी होता; पण रुग्णवाढीमुळे भारत इटलीच्या पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आला आहे. इटलीमध्ये रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३४ हजार होती. भारतामध्ये २ लाख ३६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.निर्बंध उठल्यास रुग्णवाढ होईल?कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताने तातडीने लॉकडाऊन पुकारल्यामुळे व त्याची कडक अंमलबजावणी केल्यानेच फार मोठी हानी झाली नाही असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, निर्बंध उठविल्यास रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तसा इशाराच दिला आहे. सोमवारपासून देशात व राज्यात अनेक निर्बंध रद्द होणार आहेत.कोरोनावर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा!कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा लागू पडत असल्याने राज्य सरकार बांगलादेशकडून या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. ‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन अ‍ॅण्टी व्हायरल असून ‘सार्स’ आजारासाठी ते उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. तसेच हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेनेही केला आहे.टॉपची राज्येमहाराष्ट्र82968

30152तामिळनाडू

27654दिल्ली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन