शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 31, 2020 14:45 IST

आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता.

ठळक मुद्देआता 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरू करण्यात येणार आहे.आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे.या चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते.

नवी दिल्ली - कोरोना लशीसंदर्भात भारत आता सातत्याने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात आज आरोग्यमंत्रालायाने मोठा निर्णय घेतला असून, आता 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरू करण्यात येणार आहे.

आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. या चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर आता सरकारने संपूर्ण देशातच हे ड्रय रन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्राय रनमध्ये काय होते?आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार, ड्राय रनमध्ये राज्यांना आपली दोन शहरं निवडावी लागतील. या दोन शहरांत, लस शहरात पोहोचणे, रुग्णालयापर्यंत जाणे, लोकांना बोलावणे, यानंतर डोस देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन, लसिकरण सुरू असल्याप्रमाणे केले जाईल.

याच बरोबर सरकारने कोरोना लशीसंदर्भात तयार केलेल्या कोविन मोबाईल अॅपचेही ट्रायल होईल. ड्राय रननरम्यान, ज्या लोकांना लस दिली जाणार असते, त्यांना SMS पाठवला जाईल. यानंतर अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लसिकरणावर काम केले जाईल.

पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना लस दिली जाणार -सरकारने म्हटले आहे, की लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम  एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे -देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २० ते २५ हजारांच्या आसपास आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूदर १.४५ टक्के इतका आहे.

"देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज" -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून कोरोना लसीला मंजुरी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधंdoctorडॉक्टर