शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या लसीनं जगाला कोरोनाच्या महासाथीतून वाचवलं; अमेरिकेच्या जेष्ठ वैज्ञानिकाकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 20:38 IST

Coronavirus Vaccine : भारतानं आजवर अनेक देशांना केला लसींचा पुरवठा

ठळक मुद्देभारतानं आजवर अनेक देशांना केला लसींचा पुरवठाभारताचं योगदान मोठं असल्याचं सांगत अमेरिकेतील वैज्ञानिकाकडून भारताचं कौतुक

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या महासाथीनं संपूर्ण जगालाच थांबवलं होतं. जगातील सर्वच देशांची आर्थिक हानी तर झालीच पण त्यापेक्षाही अधिक मानव हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लसी विकसित करण्यास सुरूवात केली होती. भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न दिवसरात्र सुरू होते. विक्रमी कालावधीत भारताला त्यात यशही मिळालं. भारतानं आपल्या देशात लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर अन्य देशांनाही लसीचा पुरवठा करण्यास सुरूवात केली. आताही भारताकडून अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. भारताच्या या महान कार्याचं आता जगभरातून कौतुकही होऊ लागलं आहे. भारतात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीनं जगाला या मोठ्या महासाथीतून वाचवलं आहे. भारताचं हे योगदान कमी समजू नये, असं म्हणत अमेरिकेतील एका ज्येष्ठ वैज्ञानिकानं भारताचं कौतुक केलं आहे.महासाथीदरम्यान औषध क्षेत्रात व्यापक अनुभव आणि ज्ञानामुळे भारताला 'फार्मसी ऑफ द वर्ल्ड' असं संबोधलं गेलं आहे. जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश हा भारत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मोठ्या प्रमाणात खरेदीसाठीही अनेक देशांनी भारताशी संपर्क साधला आहे. भारतानं सपूर्ण देशाच्या मदतीसाठी पुढे येत तसंच विशेषत: गरीब देशांना मोफत लसीचा पुरवठा केला आहे. भारताचं योगदान मोठं"एमआरएनएच्या दोन डोसचा कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर प्रभाव पडत नाही. परंतु भारताच्या लसीनं जगाला वाचवलं आहे आणि हे योगदान कधीही कमी समजू नये," असं मत ह्युस्टनमधील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिनचे नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे जीन डॉ. पिटर होटेज यांनी एका वेबिनारदरम्यान व्यक्त केलं. कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करणं हे या विषाणू विरोधात लढण्यासाठी जगाला भारताकडून मिळालेलं गिफ्ट आहे, असं ते म्हणाले. डॉ. होटेज हे ‘कोविड-१९ : वॅक्सीनेशन अँड पोटेंशियल रिटर्न टू नॉर्मल्सी - इफ एंड व्हेन’या वेबिनारमध्ये बोलत होते. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेककडून लसींची निर्मिती केली जात आहे. या दोन्ही लसींच्या वापरास अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिका