शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Vaccine : कोरोनावरील लससाठी ‘कोविशिल्ड’च प्रमुख दावेदार! सिरम व फायझरमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:55 IST

‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता

पुणे : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही परवानगी मागितली असल्याने आता कोणत्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. कोविशिल्ड लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येऊ शकते. तर फायझर लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमान लागते. या लसीसाठी साठवणुक यंत्रणा उभी करणे भारतासाठी सध्यातरी आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.

फायझर या औषध निर्माता कंपनीच्या लसीची परिणामकारकता ९५ टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ब्रिटनसह बहारीनमध्ये या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तर अमेरिकेसह भारतात लसीकरणासाठी परवानगी मागण्यात आली आहे. भारतामध्ये परवानगी मागणी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ सिरमनेही औधष महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. कोविशिल्ड लसीची परिणामकारकताही ९० टक्के असल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने केला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही लसींमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण फायझरसाठी भारतातील लसीकरण आव्हानात्मक ठरणार आहे.

भारतामध्ये लसींच्या साठवणुक व वितरणामध्ये या लसीला मर्यादा येऊ शकतात. ही लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानातच टिकाव धरू शकते. तर सिरमच्या लसीला २ ते ८ अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे. या लसीची साठवणुक व वितरण करणे भारताच्यादृष्टीने फारसे कठीण नाही. भारतामध्ये लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जातो. त्यासाठीची पुरेशी सज्जता आहे.  पण फायझर लसीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल. महानगरांच्या ठिकाणीच काही प्रमाणात ही व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही सिरमच्या लसीलाच अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते.----------आपल्याकडे लस साठवणुक, शीतकरणाच्या सुविधा आहेत. फायझर, मॉडर्नासह अन्य काही लशींना वेगळी साठवणुक लागत असेल तर ते आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे आपल्या देशात विकसित असलेल्या लशींचा पहिल्यांदा वापर करावा, असे सरकारने ठरविले आहे. याचा अर्थ असा नाही की अन्य लसींना परवानगी मिळणार नाही.- डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, साथरोग व संसर्गजन्य आजार विभाग, आयसीएमआर-----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारMedicalवैद्यकीय