शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:02 IST

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,०२६ वर पोहोचली आहे. या मृत्यूंची नोंद केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सगळेच आधीच काही आरोग्य समस्यांनी ग्रस्त होते.

प्रमुख राज्यांतील कोरोना स्थितीमहाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिल्लीत ३९३, गुजरातमध्ये ३९७, कर्नाटकमध्ये ३११, केरळमध्ये १४१६, महाराष्ट्रात ४९४, उत्तर प्रदेशात १३८, तामिळनाडूमध्ये २१५ आणि पश्चिम बंगालमध्ये ३७२ सक्रिय रुग्ण आहेत.

केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मृत्यू

केरळमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती आधीच गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसनाचा त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त होता. तामिळनाडूमध्ये टाइप २ मधुमेह आणि पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेल्या ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला. पश्चिम बंगालमध्ये ४३ वर्षीय महिलेला तीव्र कोरोनरी सिंड्रोम, सेप्टिक शॉक आणि तीव्र मूत्रपिंडाच्या आजार होते, तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमहाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा येथील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या १०वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यात ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी २० रुग्ण मुंबईत आढळले. सध्या, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८७३ आहे, त्यात ४८३ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनाची संख्या सतत वाढत असून, ३६९ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या नवीन उपप्रकारांची लक्षणेकोविड-१९च्या नवीन उप-प्रकाराने, NB.1.8.1, रुग्णांची संख्या वाढवली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)  या उप-प्रकाराची पुष्टी केली असून, हा ओमिक्रॉन प्रकाराचे एक वेगाने पसरलेले आणि बदलणारे रूप आहे. या विषाणूचे लक्षणे सौम्य असतात. त्यात ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, शरीरदुखी, नाक वाहणे आणि भूक कमी होणे यांचा समावेश आहे. हे लक्षणे हंगामी तापासारखीच आहेत. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि लवकर लक्षणे आढळल्यास योग्य उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य