शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: आंतरराष्ट्रीय विमानसेवेपुढे ओमिक्रॉनचे विघ्न, केंद्र सरकार घेणार फेरआढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 07:07 IST

Corona Virus: १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा तसेच विदेशी प्रवाशांच्या तपासणीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याच्या याआधी घेतलेल्या निर्णयाचा ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार व कोरोनाची जागतिक स्थिती यांचे निरीक्षण करून त्यानुसार आढावा घेण्यात येईल

नवी दिल्ली : १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा तसेच विदेशी प्रवाशांच्या तपासणीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याच्या याआधी घेतलेल्या निर्णयाचा ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार व कोरोनाची जागतिक स्थिती यांचे निरीक्षण करून त्यानुसार आढावा घेण्यात येईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठरविण्यात आले. ओमिक्रॉनची स्पाईक प्रोटिनमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा अधिक परिवर्तने झाली आहेत. या विषाणूमुळे कोरोना लसी काही प्रमाणात निष्प्रभ होण्याची शक्यता असल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

कोरोना साथीचा जिथे अधिक फैलाव आहे अशा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत ओमिक्रॉन व जागतिक कोरोना स्थितीची माहिती घेतली होती. ओमिक्राॅनची बाधा झालेले रुग्ण आता जर्मनी, इटली या देशांतही आढळले आहेत.

ओमिक्राॅन विषाणूमुळे कोरोना लसींची परिणामकारकता कमी झाल्यास भारतातील लसींचेही त्या दृष्टीने मू्ल्यमापन करावे लागेल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचे अस्तित्व अद्याप देशात आढळलेले नाही. भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांची कडक तपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ओमिक्रॉन हा नवा विषाणू आढळल्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या तसेच लसीकरण यांची व्याप्ती आणखी वाढवा, जिथे संसर्ग वाढला आहे तिथे कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्राने  राज्यांना दिल्या. 

बंगळुरूमधील दोघांना ओमिक्रॉनची बाधा नाहीदक्षिण आफ्रिकेहून बंगळुरूमध्ये आलेल्या प्रवाशांपैकी दोन जण कोरोनाबाधित असले तरी त्यांना ओमिक्रॉनची नव्हे तर डेल्टा विषाणूची बाधा झाली, असे कोरोना चाचणीतून आढळून आले. त्यामुळे सध्या भारतात ओमिक्रॉॅनने बाधित एकही रुग्ण नाही.    

नागरिकांनी घाबरू नये : आयसीएमआर-  ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. ज्यांनी दुसरी लस अद्याप घेतलेली नाही, त्यांनी ती घ्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत राहावे, असे आवाहन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे.- विषाणूत होणाऱ्या परिवर्तनामुळे एखादी साथ आणखी तीव्र होईलच असेही नाही, असे आयसीएमआरमधील साथीच्या रोगांशी संबंधित विभागाचे प्रमुख समीरण पांडा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन