शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

Corona Virus : नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, तीस दिवसांत बरे झाले २२ लाख; सक्रिय रुग्णांमध्येही घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 05:59 IST

Corona Virus : आता सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे महिनाभरात २२ लाख जण बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५९ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९३.६७ टक्के आहे तर दर आठवड्यातील संसर्गाचे प्रमाण ६.५४ टक्के आहे.

नवी दिल्ली : देशात रविवारी कोरोनाचे १ लाख १४ हजार ४६० नवे रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच ८ मे रोजी ३७ लाख सक्रिय रुग्ण होते. मात्र, आता सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे महिनाभरात २२ लाख जण बरे झाले आहेत.

याआधी ५ एप्रिल रोजी कोरोनाचे ९६ हजार ९८२ नवे रुग्ण आढळून आले होते, तर हीच संख्या ६ एप्रिल रोजी १ लाख १५ हजार ७३६ होती. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १ लाख ८९ हजार २३२ जण बरे झाले तर २६६७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८८ लाख ९ हजार ३३९ आहे व त्यातील २ कोटी ६९ लाख ८४ हजार ७८१ जण बरे झाले. 

कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५९ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९३.६७ टक्के आहे तर दर आठवड्यातील संसर्गाचे प्रमाण ६.५४ टक्के आहे. देशात आजवर कोरोना लसीचे २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ डोस देण्यात आले. 

गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ६ हजारांनी तर मृतांच्या संख्येत ७००ने घट झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण मृतांचा आकडा १ लाखाकडे गेला आहे. त्यापैकी २५ हजार रुग्ण एकट्या मे महिन्यात मरण पावले.देशात आतापर्यंत ३६ कोटी ४७ लाख ४६ हजार ५२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिली.

चीनमध्ये तीन वर्षे वयाच्या मुलांसाठीही लस चीनने तीन वर्षे वयाच्या मुलांनाही देता येईल, अशी कोरोना लस शोधून काढली आहे. सिनोव्हॅक या कंपनीने तयार केलेल्या या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली. मात्र, ही लस लहान मुलांना कधीपासून देणार हे चीनने जाहीर केलेले नाही. त्याआधी जगभरात आजवर १८ वर्षे व त्यापुढील वयाच्या लोकांसाठीच कोरोना लस देण्यात येत होती. अमेरिकेमध्ये १२ ते १५ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना लस देण्यात सुरुवात झाली आहे, तर भारतासह काही देशांत २ वर्षे ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस