शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 12:58 IST

बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड​​-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो. 

ठळक मुद्देया बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे.बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे.भारतात ३ लाखहून अधिक लोक संक्रमित

नवी दिल्ली : कोरोनाच्या मध्यम आणि गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी आता बायोकॉन नावाची कंपनी एक औषध घेऊन येत आहे. या बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे. त्याची किंमत साधारणपणे ८,००० रुपये प्रति बाटली एवढी असेल, अशी माहिती कंपनीने सोमवारी दिली.

कंपनीने म्हटले आहे, की कोविड-१९ मुळे मध्यम अथवा गंभीर अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) प्रकरणात, सायटोकाइन रिलीज सिंड्रोमच्या उपचारासाठी भारतात आणीबाणीजन्य परिस्थितीत वापरासाठी, इटोलिझुमाब इंजक्शन (25 मिग्रा/पाच मिली लीटर)च्या विक्रिला भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून मुंजुरी मिळाली आहे. 

बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड​​-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो. 

बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मजदार-शॉ म्हणाले, जोवर व्हॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोवर आपल्याला अशा जीव वाचविणाऱ्या औषधांची आवश्यकता असते. आपल्याला भलेही या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस मिळो, पण, पुन्हा कोरनाचे संक्रमण होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. आपण ज्या पद्धतीने ही लस काम करेल, अशी आशा करत आहोत, ती त्याच पद्धतीने काम करेल याचीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे.

भारतात ३ लाखहून अधिक लोक संक्रमित -देशात एकाच दिवसात कोरोनाचे २८,७०१ नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे. कोरोनाच्या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ५,५३,४७० इतकी झाली आहे. तर ३,०१,६०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या २१९१०३ चाचण्या पार पडल्या. त्यामुळे या दिवसापर्यंत राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या चाचण्यांची एकूण संख्या १,१८,०६,२५६ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicinesऔषधंmedicineऔषधंMedicalवैद्यकीय